शहरी गरीबांचे जीवनमान उंचावणे

केंद्रित क्षेत्रे

स्वच्छतेच्या सोयी – सुविधा
(Sanitation)

 

आम्ही झोपडपट्टीतील स्वच्छतेच्या गंभीर समस्या लक्षात घेऊन , रहिवासीयांना आमच्या “एक घर एक शौचालय” कार्यक्रमा अंतर्गत वैयक्तिक शौचालय उपलब्ध करून देतो
झोपडपट्टीतील रहिवासीयां बरोबर स्वच्छता , घनकचरा व्यवस्थापन मासिक पाळीची स्वच्छता. या विषयांवर कार्यशाळा घेऊन समुदायांमध्ये वर्तनात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतो.

अधिक जाणून घ्या….

गृहनिर्माण
(Housing)

झोपडपट्टीतील रहिवासीयांच्या घराचे पुनर्वसन करते वेळी, त्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देताना त्या घराच्या जमिनीवरील हक्क आणि कार्यकाळ याची काळजी घेऊन रहिवासीयांच्या सहभागाने त्यांना राहण्यायोग्य घरांची रचना करून देतो.

अधिक जाणून घ्या….

माहिती संकलन
(Data)

आम्ही भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात अग्रेसर आहोत. १९९० च्या उत्तरार्धात आम्ही शहरी गरिबांसाठी अत्यावश्यक सेवांचे वितरण सुधारण्यासाठी या स्थानिक माहितीचा वापर करू लागलो.

अधिक जाणून घ्या….

आमची गोष्ट

शहरी गरीबांच्या जीवनात बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने आर्किटेक्ट श्रीमती प्रतिमा जोशी आणि त्यांच्या दोन आर्किटेक्ट मित्रांनी मिळून १९९४ मध्ये शेल्टर असोसिएट्स या संस्थेची स्थापना केली. कामास सुरुवात केल्यावर त्यांच्या लक्षात आले की अजूनही, झोपडपट्या आवश्यक सेवांपासून वंचित आहेत. उदा. सुरक्षित निवास/घर, घराचा पत्ता व इतर आवश्यक सेवांचा अभाव इत्यादी. तसेच निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत या गरीब लोकांना डावलल्यामुळे किंवा कोणत्याही प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग नसल्याने त्यांच्या पदरी उपेक्षा येते आणि त्यांच्या असुरक्षिततेत वाढ होते आहे.

एकत्रीकरणाच्या माध्यमातून समुदाय निर्माण करणे

हक्कांचे न्याय्य वितरण आणि सर्वांसाठी अत्यावश्यक सेवा सुनिश्चित करण्याच्या या प्रवासात शहरी झोपडपट्टी समुदाय आमचे भागीदार आहेत. आम्ही विविध शैक्षणिक आणि सक्षमीकरणाच्या विकासात्मक उपक्रमांद्वारे त्यांच्याशी जोडले जातो. सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांना एकत्र आणून सामावून घेण्यासाठी नाविन्यपूर्ण साहित्य विकसित केले जाते. निरनिराळ्या प्रकारचे औपचारिक, अनौपचारिक उपक्रम आयोजित करून या साहित्याद्वारे समुदायांना मनोरंजक आणि आकर्षक पद्धतीने सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

गेल्या ३० वर्षात सध्या केलेला परिणाम

रॅपिड इन्फ्रास्ट्रक्चर मॅपिंग आणि झोपडपट्टीतील घरांचे सर्वेक्षण

वैयक्तिक शौचालयाची सुविधा

झोपडपट्टी गृहनिर्माण प्रकल्पाद्वारे लोकांचे पुनर्वसन

डिजिटल स्थानिक पत्ते

प्रभाव - प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष

खाली नमूद केलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी आम्ही सहमत आहोत.

अलिकडच्या काळातील घडामोडी

शेल्टर असोसिएट्स - इन्फोसिस फाउंडेशन, आरोहन सोशल इनोव्हेशन पुरस्काराने सन्मानित

‘‘एक घर एक शौचालय’ नावाच्या आमच्या अद्वितीय डेटा-चलित स्वच्छता मॉडेलसाठी महिला सक्षमीकरण श्रेणी अंतर्गत शेल्टर असो. ला श्रीमती सुधा मूर्ती यांच्या हस्ते “आरोहन सोशल इनोव्हेशन पुरस्कार 2023” प्रदान करण्यात आला. या यशासाठी आमचे समर्थक, भागीदार, हितचिंतक आणि वस्तीमधील रहिवासी या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आणि त्यांनी आमच्यावर दाखविलेल्या अटळ विश्वासाबद्दल आम्ही सर्वाना धन्यवाद देतो.”

शेल्टर असो. संबंधित इन्फोसिस फाऊंडेशनने बनवलेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

शेल्टर असोसिएट्स साठी विजयाचा क्षण !

“आम्हाला हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे की नवी मुंबई आणि पुणे या दोन्ही महानगरपालिकेच्या वस्ती पातळीवरील स्वच्छता कार्यक्रमांसाठी असलेल्या स्वच्छोत्सवामध्ये स्वच्छता श्रेणी अंतर्गत शेल्टर असोसिएट्सला विन्स (WINS) पुरस्कार मिळाला आहे!!! स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनात महिलांचे नेतृत्व असलेल्या संस्थांचा प्रभाव ओळखण्यासाठी, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने महिला आयकॉन्स लीडिंग स्वच्छता (WINS) ची पहिली आवृत्ती सुरू केली आहे. नेतृत्वापासून ते सामुदायिक सहभागापर्यंत या स्वच्छता कार्यक्रमांचे नेतृत्व उत्साही महिलांनी केले आहे.”

शेल्टर असो. च्या संस्थापक-संचालिका प्रतिमा जोशी यांना 'सामाजिक अभियांत्रिक सम्मान" देऊन गौरविण्यात आले.

वास्तुविशारद प्रतिमा जोशी यांना अमेरिकन अकॅडमी ऑफ इमर्जन्सी मेडिसिनचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. जोनाथन जोन्स यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. इमर्जन्सी मेडिसिनच्या १९ व्या वार्षिक अखिल भारतीय शैक्षणिक परिषदेच्या निमित्ताने ऑगस्ट २०२३ मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रशस्तीपत्र

“वृध्दावस्थेमुळे मला चालताना दुसऱ्यांची मदत घ्यावी लागत असे, नातीच्या मदतीने मी शौचालया पर्यंत जात असे त्यामुळे मला नेहमीच माझ्या नातीची काळजी वाटत असे. विशेषतः रात्री उशिरा जावे लागल्यास जास्तच काळजी वाटे. शेल्टर असोसिएट्स संस्थेने आम्हाला घरात वैयक्तिक शौचालय उपलब्ध करून दिल्याने माझी सर्वात मोठी समस्या सोडवली आहे. त्यामुळे मी त्यांची अत्यंत आभारी आहे.”

- लता मिसाळ.

लाभार्थी पुणे

“पुणे महानगरपालिकेने शेल्टर आसोसिएट्स संस्थे बरोबर स्वच्छता अभियानांतर्गत पुण्याच्या झोपडपट्यांमध्ये वैयक्तिक शौचालय प्रकल्प राबविताना भागीदारी केली असून त्यांचे ‘एक घर एक शौचालय ‘  मॉडेल अतिशय विश्वासार्ह आणि सर्वांच्या पसंतीस उतरले आहे . केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात ते स्वीकारार्ह आहे. त्यांच्याबरोबरच्या भागीदारीत स्वच्छता अभियानाचे उद्दिष्ट / लक्ष्य आम्ही नक्कीच गाठू याचा आम्हाला आत्मविश्वास आहे.”

- कुणाल कुमार.

आयुक्त, पुणे महानगरपालिका

“प्रतिमा जोशी आणि शेल्टर असोसिएट्स हे आमच्या महत्वपूर्ण एनजीओ भागीदारांपैकी एक आहेत. ज्यांनी आम्हांला सामाजिक क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी वस्तीपातळीवर माहिती संकलनाचे (डेटाचे) महत्व पटवून देऊन त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येऊ शकतो याविषयी शिक्षित केले आहे. प्रतिमा जोशी या अतिशय प्रेरणादायी संस्थापक आहेत. “

- डोनाल्ड लोबो.

संस्थापक, चिंटू गुडिया फाउंडेशन

आमचे भागीदार

slide-1
slide-2
slide-3
slide-4
previous arrow
next arrow

शेल्टर असोसिएट्स

सर्वाना समान हक्काचे वितरण व्हावे या हेतूने १९९४ मध्ये शेल्टर असोसिएट्स या सेवाभावी/ धर्मादाय संस्थेची स्थापना केली गेली. शेल्टर असोसिएट्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माहितीचे संकलन, स्वच्छता आणि गृहनिर्माण समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय व त्यानुसार अंमलबजावणी हा दृष्टिकोन समोर ठेऊन काम करते. शहरी विकासासाठी स्थानिक डेटा वापरण्यात अग्रेसर म्हणून शेल्टर असोसिएट्सला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

अधिक जाणून घ्या

आमच्या बातमी पत्रकाची सदस्यता घ्या!

15 + 11 =

संपर्क  

 +९१ ८०८७६०७५४५

   info@shelter-associates.org

    'कान्हा', ३४० ब, गल्ली क्रमांक १८, महात्मा सोसायटी, कोथरूड, पुणे - ४११०३८