स्वच्छतेच्या सोयी - सुविधा
(Sanitation)
झोपडपट्टी समुदायांमध्ये स्वच्छता आणि आरोग्य सुधारण्यासाठी हस्तक्षेप
एक घर एक शौचालय
शेल्टर असोसिएट्स ने घरगुती पातळीवर गोळा केलेल्या माहितीचा उपयोग करून, शहरी स्थानिक संस्था व वस्तीतील रहिवासी यांच्या सहाय्याने झोपडपट्टी वासियांसाठी ‘एक घर एक शौचालय ‘ हे स्विकारार्ह मॉडेल विकसित केले आहे. परिणामी, उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. सार्वजनिक शौचालयांवरचा भार (अवलंबित्व) कमी झाला आणि वस्तीमध्ये चांगले आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेला चालना मिळाली आहे.
मासिक पाळी दरम्यान पाळावयाची स्वच्छता
मासिक पाळीची आधुनिक स्वच्छता उत्पादने महाग, नैसर्गिकरीत्या विघटन न होणारी आणि महिलांच्या आरोग्यासाठी घातक आहेत. आम्ही वस्तीत घेत असलेल्या कार्यशाळांमध्ये महिला मासिक पाळीच्या आरोग्य आणि स्वच्छते संबंधित समस्या हाताळण्यास शिकतात. त्यांना मासिकपाळी – कप सारखे पर्यावरण पूरक उत्पादन वापरण्यास प्रोत्साहन दिले जाते जेणे करून होणारा पर्यावरणाचा ऱ्हास टाळता येईल.
अधिक जाणून घ्या….
घनकचरा व्यवस्थापन
घरा घरांमधून एकत्रितपणे बाहेर फेकल्या जाणाऱ्या घनकचऱ्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरते आणि त्यामुळे आरोग्य आणि पर्यावरणाला नुकसान पोहोचते. शेल्टर असोसिएट्सने वस्त्यांमध्ये घेतलेल्या सभा आणि चर्चांमुळे लोकांच्या वर्तनात बदल घडून येतो. त्यामुळे वस्तीतील रहिवासी कचरा वेगवेगळा करण्यास प्रवृत्त होतात. स्थानिक प्रशासनास झोपडपट्ट्यांची अचूक माहिती मिळाल्याने घनकचरा गोळा करण्याच्या कामात मदत होत आहे.

स्वच्छताविषयक समस्या
अचूक माहिती अभावी जास्त लोकसंख्या असलेल्या झोपडपट्ट्यांना स्वच्छता प्रदान करताना स्थानिक प्रशासनास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. बरेचदा सार्वजनिक शौचालयांची वाईट अवस्था आणि मलनिस्सारण वाहिन्यांचा अभाव लोकांना उघड्यावर शौचास जायला प्रवृत्त करतात. यातूनच महिला व वृद्धांसाठी सुरक्षितता आणि आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. घनकचऱ्याचे गैर व्यवस्थापन आणि मासिक पाळीच्या स्वच्छतेबाबतचे अज्ञान यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या वाढतात.
वस्ती पातळीवरील गोष्ट
प्रकल्प डाउनलोड
व्हिडिओ
शेल्टर असोसिएट्स
सर्वाना समान हक्काचे वितरण व्हावे या हेतूने १९९४ मध्ये शेल्टर असोसिएट्स या सेवाभावी/ धर्मादाय संस्थेची स्थापना केली गेली. शेल्टर असोसिएट्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माहितीचे संकलन, स्वच्छता आणि गृहनिर्माण समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय व त्यानुसार अंमलबजावणी हा दृष्टिकोन समोर ठेऊन काम करते. शहरी विकासासाठी स्थानिक डेटा वापरण्यात अग्रेसर म्हणून शेल्टर असोसिएट्सला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
आमच्या बातमी पत्रकाची सदस्यता घ्या!
संपर्क
+९१ ८०८७६०७५४५
info@shelter-associates.org
'कान्हा', ३४० ब, गल्ली क्रमांक १८, महात्मा सोसायटी, कोथरूड, पुणे - ४११०३८