चालू असलेले प्रकल्प

बोन्द्रेनगर, कोल्हापूर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प

A

प्रकल्प आढावा

काही व वर्षांपूर्वी कोल्हापूरमधील शहरव्यापी सामाजिक गृहनिर्माण संशोधन करतेवेळी, कोल्हापूर शहरातील प्रस्तावित रस्ता रुंदीकरणा दरम्यान शहराच्या सीमारेषेवर असलेल्या बोंद्रे नगर, वस्तीचे तेथील जीर्ण घरे आणि अस्वच्छते मुळे अत्यंत असुरक्षित झोपडपट्ट्यांपैकी एक असे मूल्यांकन केले गेले. ७७ पैकी बहुतांश शेतमजूर कुटुंबांनी सरकारच्या प्रस्तावित बहुमजली बांधकाम विकासाला विरोध केला. समुदायाच्या सांगण्यावरून शेल्टर असो. ने त्यांच्या बहु-हितधारक दृष्टिकोनात हस्तक्षेप करून एक समग्र गृहनिर्माण पर्याय तयार केला. शेल्टर ने विविध एकत्रीकरण उपक्रम हाती घेत, वस्ती सदस्यांना जागेची उपलब्धता आणि त्याची उपयोगिता याबद्दल माहिती देऊन जागेची संरचना करतेवेळी सर्वसमावेशक प्रक्रियेत वस्ती वासीयांना सामावून घेतले. शहरव्यापी कृती योजनेसाठी लाभार्थ्यांच्या नेतृत्वाखालील हा अनोखा बांधकाम प्रकल्प शहरी गरीबांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक उदाहरण बनण्याच्या मार्गावर आहे.

झोपडपट्टी ते सोसायटी प्रवास

पुनर्वसनासाठी बोंद्रे नगरची निवड

स्थापत्यकलेच्या योजनेचे नियोजन

राज्य आणि केंद्र सरकारची दखल

सहकारी संस्थेची स्थापना

शहर नियोजनास मंजुरी

लाभार्थींच्या नावे जमिनीचे हस्तांतर

लघु कर्जाचा लाभ घेताना समुदाय

संक्रमित घरे उभारण्यात आली

झोपडपट्टी पाडण्यात आली

बांधकामाला सुरुवात


लवकरच घराचा ताबा मिळणार

सार्वजनिक सभागृहाच्या बांधकामाची सुरुवात

प्रकल्प आराखडा

छायाचित्र संग्रह

Slide - 1
Slide - 2
Slide-3
Slide-4
previous arrow
next arrow

शेल्टर असोसिएट्स

सर्वाना समान हक्काचे वितरण व्हावे या हेतूने १९९४ मध्ये शेल्टर असोसिएट्स या सेवाभावी/ धर्मादाय संस्थेची स्थापना केली गेली. शेल्टर असोसिएट्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माहितीचे संकलन, स्वच्छता आणि गृहनिर्माण समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय व त्यानुसार अंमलबजावणी हा दृष्टिकोन समोर ठेऊन काम करते. शहरी विकासासाठी स्थानिक डेटा वापरण्यात अग्रेसर म्हणून शेल्टर असोसिएट्सला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

अधिक जाणून घ्या

आमच्या बातमी पत्रकाची सदस्यता घ्या!

8 + 4 =

संपर्क  

 +९१ ८०८७६०७५४५

   info@shelter-associates.org

    'कान्हा', ३४० ब, गल्ली क्रमांक १८, महात्मा सोसायटी, कोथरूड, पुणे - ४११०३८