आमच्याविषयी
शेल्टर असोसिएट्सबद्दल माहिती
सर्वाना समान हक्काचे वितरण व्हावे या हेतूने १९९४ मध्ये शेल्टर असोसिएट्स या सेवाभावी/ धर्मादाय संस्थेची स्थापना केली गेली. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माहितीचे संकलन, स्वच्छता सोयी – सुविधा आणि गृहनिर्माण समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय व त्यानुसार अंमलबजावणी हा दृष्टिकोन समोर ठेऊन शेल्टर असोसिएट्स काम करते. शहरी विकासासाठी स्थानिक डेटा वापरण्यात अग्रेसर म्हणून शेल्टर असोसिएट्सला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
आमचा दृष्टिकोन
भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मूलभूत / पायाभूत सुविधा व हक्कांचे समान वितरण असावे.
उद्दिष्ट
वस्तीतील नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी चांगल्या जीवनशैलीचा पाठपुरावा करून त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी सक्षम बनवणे.
विशेष पुरस्कार
२०२१
फोर्ब्स यादीत भारतातील सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक म्हणून ओळखले गेले
२०२०
अबू धाबी येथे यू.एन.-हॅबिटेट वर्ल्ड अर्बन फोरम १० मधील एलपीसी ऑनर पुरस्कार
२०१८
डेटाच्या नाविन्यपूर्ण वापरासाठी India Sanitation Coalition FICCI पुरस्कार
२०१७
‘पर्यावरण’ श्रेणी अंतर्गत नॅसकॉम सोशल इनोव्हेशन फोरम २०१७ चा पुरस्कार
२०१६
– स्वच्छता अभियान पुणे सर्वोत्कृष्ट प्रॅक्टिससाठी HUDCO पुरस्कार
२०१६
टाइम्स नेटवर्क ‘डिजिटल सोशल इनोव्हेशन’ पुरस्कार
२०१६
स्वच्छता अभियान पुणे सर्वोत्कृष्ट प्रॅक्टिससाठी HUDCO पुरस्कार
२०१६
टाइम्स नेटवर्क ‘डिजिटल सोशल इनोव्हेशन’ पुरस्कार
२०१७
‘पर्यावरण’ श्रेणी अंतर्गत नॅसकॉम सोशल इनोव्हेशन फोरम २०१७ चा पुरस्कार
प्रशासकीय मंडळ – सदस्य ओळख
महत्वाचे टप्पे
आर्थिक व्यवहार
नोंदणी तपशील
शेल्टर असोसिएट्स ही एक नोंदणीकृत सोसायटी आहे. सोसायटी नोंदणी क्र. Mah/८४0१-९४/पुणे. शेल्टर असोसिएट्सकडे ३0 सप्टेंबर २0२८ पर्यंत वैध एफसीआरए प्रमाणपत्र आहे.
वस्ती समुदाय व शासकीय अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेतून संस्थापकांना दोन गोष्टी जाणून घेता आल्या त्या म्हणजे अशा की, झोपडपट्ट्यांची उपलब्ध असलेली माहिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात खूप मोठी तफावत आहे. वस्ती समुदायांना विकास कामात सहभागी करून घेणे आवश्यक आहे. परिणामी वस्त्यांमध्ये विकास घडवून आणण्यासाठी माहिती आणि वस्ती समुदाय केंद्रस्थानी ठेवणे महत्वाचे आहे.
अथक प्रयत्न आणि कार्याची पुनरावृत्ती यांच्या परिणामाने एकोणीशे नव्वद सालच्या उत्तरार्धात एक उत्तम भौगोलिक माहिती प्रणाली ( GIS ) निर्माण झाली. प्रशिक्षित GIS टीमने वस्त्यांमध्ये सर्वेक्षण सुरु केले आणि सामाजिक, आर्थिक व पायाभूत सेवा सुविधांची माहिती प्रणाली तयार केली. त्यानंतर आम्ही सर्वप्रथम पुणे महानगरपालिका अंतर्गत शहर व्याप्त वस्त्यांचे दारिद्र्य सर्वेक्षण हाती घेतले आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील पुरावा आधारित वस्त्यांच्या विकास कार्यात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमचा “एक घर एक शौचालय ” प्रकल्प. प्रकल्प अंमलबजावणी भौगोलिक माहिती प्रणालीच्या ( GIS ) आधारे केली जात असून आजवर महाराष्ट्रातील ७ शहरांमध्ये भागीदारी तत्वाच्या आधारे २७,५५० पेक्षा जास्त वैयक्तिक शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. हा उपक्रम आमच्या कामाचा प्रमुख भाग असून त्याद्वारे झोपडपट्टीतील दीड लाख व्यक्तींच्या आरोग्य आणि स्वच्छता विषयक सवयीत सुधारणा झाली आहे.
वास्तुविशारद म्हणून शेल्टर असो. संस्थापकांना विश्वास आहे की सामाजिक बदल घडवून आणण्याची मोठी क्षमता दर्जेदार अंगभूत वातावरणामध्ये आहे. या विचाराने प्रवृत्त होत संस्थेने १९९६-९७ मध्ये दत्तवाडी, पुणे. येथे पहिला गृहनिर्माण प्रकल्प उत्स्फूर्तपणे हाती घेतला व यशस्वीपणे पूर्ण देखील केला. ज्याचा उल्लेख आमच्या कार्यातील मैलाचा दगड म्हणून करता येईल. एकूणच हा प्रकल्प सर्वार्थाने असाधारण होता असे म्हणावे लागेल , कारण समुदायातील लाभार्थी महिलांचा प्रकल्पामध्ये कृतिपूर्ण सहभाग होता . भविष्यातील आमच्या सर्व गृह प्रकल्पांसाठी हा प्रकल्प एक आदर्श ठरतो. संपूर्ण प्रक्रियेमध्ये म्हणजे अगदी प्रकल्पाच्या आखणीपासून पुढील प्रत्येक पायरीवर समूहाचा सहभाग महत्वाचा आहे. सरकारच्या पीएमएवाय गृहनिर्माण योजनेंतर्ग सध्या हाती घेतलेला बोंन्द्रेनगर, कोल्हेपूर येथील झोपडपट्टी पुनर्विकसनाचा लाभार्थी -भिमुख प्रकल्प हे याचे उत्तम उदाहरण आहे.
गेल्या ३ दशकात आम्ही महाराष्ट्रातील ६५० झोपड्पट्ट्यांपैकी , ४ लाख झोपड्पट्टीवासियांवर थेट परिणाम केला आहे. स्थानिक प्रशासन व वस्तीतील रहिवासीयांना एकाच व्यासपीठावर आणल्यामुळे हे शक्य झाले. भौगोलिक माहिती प्रणाली व वस्तीतील समुदायाची संवेदनशीलता या दोहोंच्या एकत्रिकारणाने एक नवे व्यासपीठ उपलब्ध होऊन , एक समान उद्दिष्ट गाठण्यासाठी एकाचवेळी अनेक भागधारक भाग घेऊ शकतात. ज्यामुळे कामात गतिशिलता येऊन, शहर विकासात वस्तीतील रहिवासी देखील समान भागीदार बनतात.
मूळ मूल्ये
- प्रतिष्ठा: आदरयुक्त नातेसंबंधांची जोपासना
- गुणवत्ता: शाश्वत परिणामांसाठी गुणवत्ता पूर्वक / दर्जेदार काम
- प्रामाणिकपणा: सत्याची कास धरून वाटचाल
- नाविन्य: चांगली सेवा देण्यासाठी नाविन्याचा शोध
- संघकार्य: कायम संघ भावनेने / एकत्रित कामास प्राधान्य
- सहयोग: सर्व भागधारकांचा निर्णयप्रक्रियेत समावेशक
शेल्टर असोसिएट्स
सर्वाना समान हक्काचे वितरण व्हावे या हेतूने १९९४ मध्ये शेल्टर असोसिएट्स या सेवाभावी/ धर्मादाय संस्थेची स्थापना केली गेली. शेल्टर असोसिएट्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माहितीचे संकलन, स्वच्छता आणि गृहनिर्माण समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय व त्यानुसार अंमलबजावणी हा दृष्टिकोन समोर ठेऊन काम करते. शहरी विकासासाठी स्थानिक डेटा वापरण्यात अग्रेसर म्हणून शेल्टर असोसिएट्सला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
आमच्या बातमी पत्रकाची सदस्यता घ्या!
संपर्क
+९१ ८०८७६०७५४५
info@shelter-associates.org
'कान्हा', ३४० ब, गल्ली क्रमांक १८, महात्मा सोसायटी, कोथरूड, पुणे - ४११०३८