समुदाय सहभाग

समुदायांना अपेक्षित सामाजिक वर्तन अवलंबण्यासाठी उद्युक्त करणे

झोपडपट्टीत राहणारे रहिवासी सामान्यत: महत्वाच्या माहितीपासून वंचित असतात व त्याचा परिणाम त्यांच्या निर्णय क्षमतेवर होतो. खऱ्या अर्थाने वस्तीवासियांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी त्यांच्याशी प्रभावीपणे संवाद साधणे जरुरीचे आहे. वस्तीमध्ये हस्तक्षेप करताना प्रथम आमचा स्वयंसेवकांचा गट वस्तीमध्ये जाऊन रहिवासीयांना स्वच्छता, आरोग्य, महिलांसाठी मासिकपाळी दरम्यान पाळावयाची स्वच्छता आणि इतर संबंधित विविध विषयांवर चर्चेद्वारे, माहिती देतात व त्याद्वारे त्यांचा दृष्टिकोन आणि सवयी बदलण्याचा प्रयत्न केला जातो. वस्तीवासियांबरोबर चर्चेद्वारे विचार आणि माहितीची देवाणघेवाण झाल्याने, समुदाय कृती करण्यास सक्षम होतात. समुदाय सहभाग हि दुतर्फी प्रक्रिया आहे. परिणामी समुदायांबरोबर संवाद साधल्याने वस्तीतील आमचा हस्तक्षेप लक्षणीय महत्वपूर्ण आणि व्यवहार्य ठरतो.

वर्तणूक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील

संवाद साधण्यासाठी आणि सदस्यांचा सहभाग नोंदवण्यासाठी वस्ती मध्ये सार्वजनिक बैठकांचे आयोजन.

आरोग्य, स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शनपर चर्चा.
साप शिडी, चक्रव्यूह या सारख्या अनौपचारिक खेळातून सकारात्मक वर्तनाचे शिक्षण आणि बळकटीकरण.
मासिक पाळी स्वच्छता, घनकचरा, पर्यावरण आणि स्वच्छता यासारख्या मुद्यांवर विविध उपगटांना शिक्षित करणे.

समुदाय सभा

परिणाम केंद्रित गट चर्चा

पटावरील मार्गदर्शक खेळ

जागृती कार्यशाळा

विषिष्ट दिवस साजरे करणे – नागरी समस्यांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी विशेष दिवसांच्या आसपास मजेदार उपक्रम आयोजित करणे.

गाणी व नाट्य सादरीकरणातून वैयक्तिक आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित चांगल्या सवयींचा मागोवा,

उदा. स्वच्छतेची सवय म्हणून हात धुणे.

लहान मुलांना कार्यक्रमात गुंतवून ठेवण्यासाठी कठपुतळ्यांसह संवाद कथा सादरीकरण.

वस्तीत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी स्पर्धा आयोजन.

विशिष्ट दिवस समारंभपूर्वक साजरे करणे

गाणी आणि पथनाट्ये

कठपुतळी कार्यक्रम

चालता बोलता प्रश्नमंजुषा

वर्तणुक निगडीत बदल सुलभ करण्यासाठी उपक्रम

संवाद साधण्यासाठी आणि सदस्यांचा सहभाग नोंदवण्यासाठी वस्ती मध्ये सार्वजनिक बैठकांचे आयोजन.

समुदाय सभा

संवाद साधण्यासाठी आणि सदस्यांचा सहभाग नोंदवण्यासाठी वस्ती मध्ये सार्वजनिक बैठकांचे आयोजन.

परिणाम केंद्रित गट चर्चा

साप शिडी, चक्रव्यूह या सारख्या अनौपचारिक खेळातून सकारात्मक वर्तनाचे शिक्षण आणि बळकटीकरण.

पटावरील मार्गदर्शक खेळ

मासिक पाळी स्वच्छता, घनकचरा, पर्यावरण आणि स्वच्छता यासारख्या मुद्यांवर विविध उपगटांना शिक्षित करणे.

जागृती कार्यशाळा

नागरी समस्यांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी विशेष दिवसांच्या आसपास मजेदार उपक्रम आयोजित करणे.

विशिष्ट दिवस समारंभपूर्वक साजरे करणे

गाणी व नाट्य सादरीकरणातून वैयक्तिक आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित चांगल्या सवयींचा मागोवा उदा. स्वच्छतेची सवय म्हणून हात धुणे.

गाणी आणि पथनाट्ये

विशेषतः समाजातील मुलांना कार्यक्रमात गुंतवून ठेवण्यासाठी हातातील कठपुतळ्यांसह संवाद कथा सादरीकरण

कठपुतळी कार्यक्रम

जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी स्पर्धा आयोजन.

चालता बोलता प्रश्नमंजुषा

सक्षमीकरण

समुदायामध्ये शेवटच्या टप्प्यातील बदल वस्तीतील स्वयंसेवक आणि प्रशासकीय सदस्य घडवतात. या प्रवासात त्यांना मदत करण्यासाठी आम्ही डिजिटल अँप्स च्या साहाय्याने सर्वेक्षण करणे , प्रकल्पांच्या देखरेखीसाठी नकाशे व प्लस कोड कसे वापरायचे यासारख्या विविध विषयांवर प्रशिक्षण सत्र आयोजित करतो. तसेच स्वयंसेवक आणि प्रशासकीय सदस्यांसाठी मानसिक आरोग्य कार्यशाळा देखील आयोजित करतो. एखाद्या विशिष्ट भागाची जबाबदारी स्वयंसेवकांना देताना सूक्ष्मस्तरीय अवकाशीय माहितीचा वापर करून झोपडपट्टीचे विविध भागात विभाजन केले जाते. ज्यामुळे कोणीही स्वयंसेवक मागे राहणार नाही याची खात्री होते व स्वयंसेवक समाजात बदल घडवून आणण्यासाठी सक्षम बनतात.

सकारात्मक परिणाम

शेल्टर असोसिएट्स

सर्वाना समान हक्काचे वितरण व्हावे या हेतूने १९९४ मध्ये शेल्टर असोसिएट्स या सेवाभावी/ धर्मादाय संस्थेची स्थापना केली गेली. शेल्टर असोसिएट्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माहितीचे संकलन, स्वच्छता आणि गृहनिर्माण समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय व त्यानुसार अंमलबजावणी हा दृष्टिकोन समोर ठेऊन काम करते. शहरी विकासासाठी स्थानिक डेटा वापरण्यात अग्रेसर म्हणून शेल्टर असोसिएट्सला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

अधिक जाणून घ्या

आमच्या बातमी पत्रकाची सदस्यता घ्या!

6 + 4 =

संपर्क  

 +९१ ८०८७६०७५४५

   info@shelter-associates.org

    'कान्हा', ३४० ब, गल्ली क्रमांक १८, महात्मा सोसायटी, कोथरूड, पुणे - ४११०३८