सांख्यिकी डेटा

सर्वांसाठी माहिती संकलन (Data)

झोपडपट्टीतील सर्वेक्षणा द्वारे माहिती गोळा करणे, माहितीचे एकत्रीकरण / संकलन करणे आणि ती माहिती प्रकाशित करणे या प्रक्रियेत शेल्टर असोसिएट्स अग्रेसर आहे. शेल्टर असोसिएट्स झोपडपट्टी समुदायातील लोकांना वस्तीतील माहिती गोळा करणे , नकाशे वाचणे इ. बद्दल प्रशिक्षण देते. त्यांना समुदायाबद्दल अद्ययावत माहिती पुरवल्याने त्यांच्या ठिकाणी निर्णय घेण्याचे सामर्थ्य आल्याने ते विकास प्रक्रियेचा एक भागीदार बनुन जातात. संकलित केलेली ही सर्व माहिती प्रशासकीय संस्था, समुदाय व सेवा वितरण करणाऱ्या संस्था यांच्यामधील दुवा साधण्याचे काम उत्तमरीत्या पार पाडते आणि लाभार्थ्यांना विकास कार्याचा भागीदार बनवते. यापूर्वीच्या पारंपरिक माहितीप्रणालीमध्ये महिला आणि मुलींचा समावेश केलेला नव्हता , परंतु शेल्टर असो. ने मात्र हा मतभेद टाळून सर्व माहिती निर्देशित केली आहे. आमचा सर्वसमावेशक माहिती संकलनाचा हा एकमेवाद्वितीय उपक्रम सर्व भागधारकांमध्ये माहिती बाबत स्पष्टता, सहजता आणि आत्मविश्वास निर्माण करतो.

सीमा रेषांचे माहिती संकलन (Data)

डेटा डॅशबोर्ड पाहण्यासाठी शहराच्या नकाशा खाली क्लिक करा

शेल्टर असोसिएट्स

सर्वाना समान हक्काचे वितरण व्हावे या हेतूने १९९४ मध्ये शेल्टर असोसिएट्स या सेवाभावी/ धर्मादाय संस्थेची स्थापना केली गेली. शेल्टर असोसिएट्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माहितीचे संकलन, स्वच्छता आणि गृहनिर्माण समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय व त्यानुसार अंमलबजावणी हा दृष्टिकोन समोर ठेऊन काम करते. शहरी विकासासाठी स्थानिक डेटा वापरण्यात अग्रेसर म्हणून शेल्टर असोसिएट्सला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

अधिक जाणून घ्या

आमच्या बातमी पत्रकाची सदस्यता घ्या!

4 + 4 =

संपर्क  

 +९१ ८०८७६०७५४५

   info@shelter-associates.org

    'कान्हा', ३४० ब, गल्ली क्रमांक १८, महात्मा सोसायटी, कोथरूड, पुणे - ४११०३८