काही इतर हस्तक्षेप

कोविड -१९ महामारी

महाराष्ट्रातील कोविड – १९ महामारी काळात रुग्णांमध्ये वाढ होत असताना वस्तीतील कुटुंबांना त्वरित सहाय्य मिळवून देणे आणि त्यांच्या स्वच्छता सवयी सुधारण्याबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण करणे, महामारी आणि त्याची प्रतिबंधात्मक लस टोचून घेण्याबाबत असणारे गैरसमज दूर करणे अत्यंत महत्वाचे होते. आमच्याकडे तयार असलेली वस्तीतील माहिती आणि गेल्या काही वर्षात वस्ती समुदायांबरोबर प्रस्थापित केलेल्या संबंधांमुळे आम्हाला त्यांच्याबरोबर संपर्क साधणे व महामारीविषयी जागरूकता निर्माण करणे सहज शक्य झाले. स्वच्छता संच, अन्नधान्य इत्यादींसारख्या आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासोबतच आम्ही पुणे, पिंपरी-चिंचवड, नवीमुंबई आणि कोल्हापूर या ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या पाठिंब्याने कोविड -१९ लसीकरण मोहीम राबविली. कोविड -१९ सारख्या महामारीने आम्हाला वस्ती समुदायांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वयंसेवकांचे जाळे तयार करण्याची प्रेरणा दिली.

अंमलबजावणी

स्वच्छता संचांचे वितरण

अन्नधान्याचे वाटप

कोविड-१९ जागरूकता कार्यक्रम

कोविड-१९ लसीकरण

सामुदायिक स्वच्छता सुधारणा

महानगर पालिका कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण

कार्यपद्धती

कोविड आपत्ती निवारण कार्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे पद्धतशीरपणे एकत्र केलेल्या माहितीचा खूप उपयोग झाला. विविध भागधारकांचा सहभाग आणि समन्वयाचे योगदान हा या कार्याचा मूळ गाभा होता. प्लस कोड संबंधित सूक्ष्म स्थानिक माहितीमुळे लसीकरण न झालेला विभाग ओळखण्यास मदत होऊन ज्याठिकाणी मदत पोहोचली नाही तेथे त्वरित महामारी जागरूकता आणि लसीकरण सुविधा उपलब्ध करून देणे शक्य झाले. बहु-भागधारकांचा समावेश, त्यांच्या बरोबर संवाद आणि एकत्रिकरण केल्याने समुदायांना माहिती देऊन सक्षम करणे शक्य झाले.

समुदाय कथा

कोल्हापूरच्या राजेंद्रनगर मध्ये ७४ वर्षीय नेत्रहीन आणि शारीरिकदृष्ट्या अपंग श्री. धोंडीबा रोडगे एकटे राहतात. कोविड-१९ महामारी शिखरावर असताना, श्री. धोंडीबाना लस घेण्यासाठी दवाखान्यात जाणे अशक्य होते. जेव्हा आम्हाला ही माहिती मिळाली तेव्हा आम्ही ताबडतोब त्यांची जवळच्या लसीकरण शिबिरात जाण्याची व्यवस्था केली व त्यांचे लसीकरण केले. श्री. धोंडीबा, त्यांची भीती दूर केल्याबद्दल आणि लसीकरणासाठी विशेष व्यवस्था केल्याबद्दल शेल्टर असो. चे आभार मानतात

श्री. धोंडीबा रोडगे,

राजेंद्र नगर, कोल्हापूर

कोविड-१९ लसीकरण पाहणी आणि मागोवा

झोपडपट्टीतील प्रत्येक घर प्लस कोडने (सांख्यिकी सूक्ष्मस्तरीय स्थानिक माहिती) जोडले असल्याने आम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांच्या लसीकरणाच्या स्थितीचा मागोवा घेण्यास आणि त्यावर लक्ष ठेवण्यास मदत झाली. तसेच ही माहिती संबंधित महानगरपालिकांशी नियमितपणे सामायिक केल्यामुळे वेळेवर लसीकरण उपलब्ध करणे शक्य झाले

परिणाम

८००+

कोविड-१९ महामारी दरम्यान दररोज ८०० हून अधिक जनजागृती कॉल

१००+

कोविड मदत कार्यात १०० पेक्षा अधिक सामुदायिक स्वयंसेवक सहभागी

९०+

९० पेक्षा अधिक कोविड-१९ लसीकरण शिबिरांची सोय

१८,००० +

कोविड-१९ साठी १८,००० पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण

१२,५०० +

१२,५०० पेक्षा अधिक व्यक्तींनी अन्न, धान्य आणि स्वच्छता संचांच्या माध्यमातून दिलासा

शेल्टर असोसिएट्स

सर्वाना समान हक्काचे वितरण व्हावे या हेतूने १९९४ मध्ये शेल्टर असोसिएट्स या सेवाभावी/ धर्मादाय संस्थेची स्थापना केली गेली. शेल्टर असोसिएट्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माहितीचे संकलन, स्वच्छता आणि गृहनिर्माण समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय व त्यानुसार अंमलबजावणी हा दृष्टिकोन समोर ठेऊन काम करते. शहरी विकासासाठी स्थानिक डेटा वापरण्यात अग्रेसर म्हणून शेल्टर असोसिएट्सला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

अधिक जाणून घ्या

आमच्या बातमी पत्रकाची सदस्यता घ्या!

12 + 7 =

संपर्क  

 +९१ ८०८७६०७५४५

   info@shelter-associates.org

    'कान्हा', ३४० ब, गल्ली क्रमांक १८, महात्मा सोसायटी, कोथरूड, पुणे - ४११०३८