प्रशासकीय मंडळ

श्री. अरुण काडेकोडी
अध्यक्ष
संगणक विज्ञान विषयातील M.Tech पदवी मिळवली असून सॉफ्ट कॉर्नर या कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ते भारतीय संगणक सोसायटीचे सदस्य असून त्यांनी अनेक तंत्रज्ञानविषयी परिषदांचे अध्यक्षपद भूषविले आहे. तसेच विद्यार्थी विषयक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

श्रीमती प्रतिमा जोशी
साचिव
संस्थापिका प्रतिमा जोशी यांनी लंडनस्थित बार्टलेट स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड प्लॅनिंगमधून मास्टर्स-इन-आर्किटेक्चर केले असून, ‘Google अर्थ हिरो पुरस्कार’ प्राप्त करणाऱ्या त्या एकमेव भारतीय महिला आहेत. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देणारी प्रतिष्ठित अशोका फेलोशिपच्या त्या मानकरी असून बीबीसी सारख्या नावाजलेल्या वृत्तवाहिनीने ‘भारतातील झोपडपट्टी आर्किटेक्ट’ असा त्यांचा गौरव केला आहे.

श्रीमती सुप्रिया वैद्य
खजिनदार
गृह विज्ञान शाखेच्या पदवीधर असून, अनेक वर्ष शाळेत अध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. श्री रामचंद्र मिशन या अध्यात्मिक केंद्राशी संलग्न असून नोबल अॅग्रो-पशुखाद्य निर्मिती लिमिटेडच्या संस्थापक-संचालिका आहेत.

डॉ. निर्मला पंडित
मंडळाचे सदस्य
मानवी हक्क आणि कायदा शास्त्रातील डॉक्टरेट ही उच्च पदवी मिळवली असून त्यांनी पुणे विद्यापीठात कायदेशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून काम केले आहे. आंतरराष्ट्रीय ज्युरिस्ट्स, जिनिव्हा येथे आशिया पॅसिफिकचे अधिकारी पद भूषवले असून त्यांचा अमेरिकेच्या ब्लूमिंग्टन येथील इंडियाना युनिव्हर्सिटीशी संबंध होता. तसेच त्यांनी यू.एन. विद्यापीठ, टोकियो येथे निमंत्रित/अतिथी प्राध्यापिका म्हणून काम केले आहे.

श्री. मानस रथ
मंडळाचे सदस्य
श्री. मानस रथ हे लिप ( लीडरशिप, एक्सलन्स अँड पार्टनरशिप फॉर सिटीज ) या संस्थेचे संस्थापक आहेत. जी संस्था स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, हरितीकरण आणि परवडणारी घरे यांसह शहरी समस्या सोडवणाऱ्या व्यावसायिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करते. तसेच, रथ हे बोर्डा (ब्रेमेन ओव्हरसीस रिसर्च अँड डेव्हलोपमेंट अससोसिएशन) आणि डच टेक-ए-स्टेक इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंट फंड येथे वरिष्ठ सल्लागार आहेत. यापूर्वी त्यांनी दसरा आणि इन्व्हेस्टमेंट बँक एवेंडस कॅपिटल येथेही काम केले आहे. /p>

श्री. विशाल जैन
मंडळाचे सदस्य
विद्युत अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असून त्यांनी व्यवस्थापन शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ते D P Coalition चे सह-संस्थापक आणि Future PROOF चे विश्वस्त आहेत. अनेक शहरांच्या नियोजन कार्याबरोबरच शहरी गरिबांसाठी घनकचरा व्यवस्थापन, नागरी वित्त व्यवस्थापन, गरिबांचा उपजीविका प्रश्न या सारख्या शहरी समस्या निराकरण कार्यात देखील त्यांचा सहभाग आहे.

श्री. अश्विन त्रिमल
मंडळाचे सदस्य
बी.एस.सी. , एम.बी.ए असून, पुणे येथील “ट्रू स्पेस” या रिअल इस्टेट कंपनीचे संस्थापक-संचालक आहेत. मुख्यत्वे पुण्यातील प्रीमियम निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांच्या विकासासाठी विशेष कार्यरत. डोअर स्टेप स्कूल आणि लक्ष्य यांसारख्या एनजीओ बरोबर संलग्न आहेत.

श्रीमती वैशाली भागवत
मंडळाचे सदस्य
क्रॅनफिल्ड युनिव्हर्सिटी, यू.के येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्या वकिली व्यवसायात कार्यरत असून त्यांच्या पाठीशी मोठा अनुभव आहे. ब्रिटीश उच्च आयोगाचा एक प्रतिष्ठित कार्यक्रम “दीशा” च्या माजी विद्यार्थीनी असून सायबर कायदा आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
शेल्टर असोसिएट्स
सर्वाना समान हक्काचे वितरण व्हावे या हेतूने १९९४ मध्ये शेल्टर असोसिएट्स या सेवाभावी/ धर्मादाय संस्थेची स्थापना केली गेली. शेल्टर असोसिएट्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माहितीचे संकलन, स्वच्छता आणि गृहनिर्माण समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय व त्यानुसार अंमलबजावणी हा दृष्टिकोन समोर ठेऊन काम करते. शहरी विकासासाठी स्थानिक डेटा वापरण्यात अग्रेसर म्हणून शेल्टर असोसिएट्सला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
आमच्या बातमी पत्रकाची सदस्यता घ्या!
संपर्क
+९१ ८०८७६०७५४५
info@shelter-associates.org
'कान्हा', ३४० ब, गल्ली क्रमांक १८, महात्मा सोसायटी, कोथरूड, पुणे - ४११०३८