माहिती संकलन (Data)

शेल्टर असोसिएट्सने तयार केलेल्या विविध प्रकारच्या माहितीचे संकलन (Data)

सांख्यिकी डेटा

गुगल अर्थ च्या साहाय्याने प्रथम आम्ही एखादे विशिष्ठ शहर आणि त्या शहरातील झोपडपट्टीच्या सीमारेषा ठरवतो. प्रशासकीय आणि निवडणूक प्रभागाच्या विभागवार विभागणीनुसार शहरे आणि झोपडपट्ट्यांचा माहितीसह डिजिटाइज्ड नकाशे आपल्याला पाहता येतात. एखाद्या झोपडपट्टीचा विकास आराखडा मांडताना तेथील पायाभूत सेवा व सुविधा यांची तपशीलवार स्थिती जाणून घेण्यासाठी देखील या सविस्तर अहवालाचा उपयोग होतो

अधिक जाणून घ्या….

सूक्ष्मस्तरीय स्थानिक डेटा

झोपडपट्टीतील कुटुंबांचे गृह पातळीवर (RHS ) केलेल्या सर्वेक्षणा दरम्यान प्राप्त झालेली माहिती नकाशावर अचूक पद्धतीने जोडली जाते त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रत्येक घराची सूक्ष्मस्तरीय माहिती प्राप्त होते. या माहितीच्या आधारे वेगवेगळ्या सेवा व सुविधांची परिस्थिती तपशीलवार जाणून घेणे शक्य होते

अधिक जाणून घ्या….

सांख्यिकी पत्ता (प्लस कोड)

झोपडपट्टीतील प्रत्येक घर नकाशावर अचूक पद्धतीने जोडले गेल्याने त्या विशिष्ट घराचा स्वतंत्र सांख्यिकी पत्ता ( प्लस कोड) निर्माण होतो. यामुळे सर्वांनाच तेथे राहणाऱ्या कुटुंबां पर्यंत पोहोचणे सहज शक्य होते. तसेच अत्यंत आवश्यक व ऑनलाईन सेवा त्यांना सहजतेने प्राप्त करता येतात. प्लस कोड च्या साहाय्याने विशिष्ट घराला मिळणाऱ्या सेवा व सुविधा, तसेच एखाद्या प्रकल्पा बद्दलची माहिती किंवा त्याची प्रगती जाणून घेणे देखिल सहज शक्य होते

अधिक जाणून घ्या….

कृती योग्य माहितीची शक्ती

कोणत्याही वस्तीत हस्तक्षेप करण्यापूर्वी आपल्याकडे वस्तीची अचूक आणि अंमलबजावणी करण्यायोग्य पुरावा आधारीत माहिती असणे अत्यंत जरुरीचे आहे. विशिष्ट प्रकारे विकसित केलेली भौगोलिक सूचना प्रणाली (GIS) आम्हाला आमच्या प्रकल्पांचे नियोजन व देखरेख करण्यासाठी मार्गदर्शक ठरते.
वस्ती बाबत अस्तित्वात असलेली माहिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये तफावत असल्याचे लक्षात आल्याने, आम्ही वस्तीतील कुटुंबे व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने माहितीचे पुनरुज्जिवन करायला सुरुवात केली. त्यामुळे स्थानिक रहिवासीयांना वस्तीतील माहितीबाबत स्पष्टता  आल्याने लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हायला मदत झाली. स्थानिक प्रशासनाद्वारे या माहितीचे प्रमाणीकरण केले जाते व त्यानंतर माहिती सार्वजनिक पातळीवर सर्वांसाठी उपलब्ध करून दिली जाते. शहरी गरिबांच्या जीवनात इच्छित बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात आम्हाला यश मिळत आहे किंवा नाही याचे खरेखुरे मोजमाप करताना ही प्रस्थापित माहिती अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी बजावते.

समुदाय कथा

 

Translate

राजेंद्रनगर येथील श्रीमती भाग्यश्री कल्याणकर या एका विद्युत व्यवसाय दुकानाच्या मालक आहे. त्यांना अनेकदा ऑनलाइन वस्तूंची मागणी करावी लागते. यापूर्वी त्यांना जवळच्या ठिकाणी स्वतः जाऊन वस्तू, साहित्य घ्यावे लागत असे. पण आता त्या , घराचा स्वतंत्र प्लस कोड पुरवठादारांशी सामायिक करतात , जे सहजपणे गुगल नकाशा मार्ग दर्शवतात आणि त्यामुळे घराच्या दारात वस्तूंची डिलिव्हरी मिळते. परिणामी केवळ वेळ वाचतो असे नाही तर त्यांचा व्यवसायही सुधारत आहे.

श्रीमती भाग्यश्री कल्याणकर,

राजेंद्र नगर, कोल्हापूर

शेल्टर असोसिएट्स

सर्वाना समान हक्काचे वितरण व्हावे या हेतूने १९९४ मध्ये शेल्टर असोसिएट्स या सेवाभावी/ धर्मादाय संस्थेची स्थापना केली गेली. शेल्टर असोसिएट्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माहितीचे संकलन, स्वच्छता आणि गृहनिर्माण समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय व त्यानुसार अंमलबजावणी हा दृष्टिकोन समोर ठेऊन काम करते. शहरी विकासासाठी स्थानिक डेटा वापरण्यात अग्रेसर म्हणून शेल्टर असोसिएट्सला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

अधिक जाणून घ्या

आमच्या बातमी पत्रकाची सदस्यता घ्या!

1 + 1 =

संपर्क  

 +९१ ८०८७६०७५४५

   info@shelter-associates.org

    'कान्हा', ३४० ब, गल्ली क्रमांक १८, महात्मा सोसायटी, कोथरूड, पुणे - ४११०३८