गृहनिर्माण

सामाजिक गृहनिर्माण प्रकल्प

संशोधन

आमचा शहर पातळीवरील सामाजिक गृहनिर्माण संशोधन प्रकल्प हा कोल्हापूर शहरातील सरकारी मालकीच्या जमिनीवरील अन्य ४४ वस्त्यांमधे सामाजिक गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यासाठी एक नवे दालन उपलब्ध करुन देत आहे. वस्त्यांमधून गोळा केलेली माहिती हा संशोधनाचा पाया असून येथे झोपडपट्ट्यांची असुरक्षितता मापन करण्यासाठी भागधारकांना सहभागी करून घेतले आहे . तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शेल्टर असोसिएट्सने कोल्हापूर शहरा मधील झोपडपट्यांसाठी एक असामान्य पुनर्विकास योजना विकसित केली आहे

अधिक जाणून घ्या…..

झोपडपट्टी पुनर्वसन

शेल्टर असोसिएट्स ने आतापर्यंत ३ प्रमुख गृह प्रकल्पांची अंमलबजावणी करताना पुणे आणि सांगली-मिरज या शहरांतील असुरक्षित झोपडपट्ट्यां मधील ९००० लोकांचे पुनर्वसन केले आहे. हे सर्व प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसनासाठी एक व्यवहार्य पर्याय दर्शवतात. स्वतःच्या हक्काच्या घराची रचना कशी असावी , घरातील जागेची विभागणी आणि मूलभूत सोयीसुविधा इत्यादीसाठी योजना निश्चिती करताना सुरुवातीपासूनच रहिवासियाना सहभागी करून घेतले गेले

अधिक जाणून घ्या…..

चालू असलेले प्रकल्प

कोल्हापूर येथे सध्या चालू असलेल्या बोंद्रेनगर गृहनिर्माण प्रकल्पा मधील ७७ असुरक्षित कुटुंबाना स्वतःचे हक्काचे घर उपलब्ध करून देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प PMAY गृहनिर्माण योजनेंतर्गत राबविला जात आहे. प्रकल्प राबवताना त्याचे नियोजन, आखणी, आर्थिक व्यवस्थापन या सर्व प्रक्रियांमध्ये सामिल होऊन समुदायाने सक्रियता दाखवली असल्याने याचे स्वरूप लाभार्थीभिमुख झाले आहे.

अधिक जाणून घ्या…..

झोपडपट्टी ते सोसायटी प्रवास

आजपर्यंत गरिबांसाठी राबवलेले सामाजिक गृहनिर्माण प्रकल्प हे नेहमीच अपारदर्शक रीतीने अमलात आणले गेले आहेत. त्याला पर्याय म्हणून शहराच्या विकासासाठी समुदायभिमुख, बहू भागधारक दृष्टिकोन ठेऊन आम्ही सामाजिक गृहनिर्माण क्षेत्रात बदल घडवून आणत आहोत. नागरी पायाभूत सुविधा प्रदान करताना शेल्टर असोसिएट्स ने संकलित केलेली माहिती स्थानिक प्रशासनाला उपयोगी ठरते. सुरुवातीपासून रहिवाशांना योजनेत सामील केल्याने व घराचे मालकी हक्क मिळाल्याने त्यांना जबाबदारीची जाणीव निर्माण होऊन जागेची देखभाल करताना साहजिकच स्वच्छतेचे भान येते. परिणामी भावी पिढ्यांसाठी एकप्रकारे आर्थिक गतिशीलता आणि सुरक्षितता निर्माण होते. एकूणच सामाजिक वातावरण बदलल्याने समाजातील दुर्लक्षित घटकांबद्दलचा इतरांचा समज देखील बदलतो. त्यांचा स्वीकार केला जातो आणि हळूहळू त्यांना मुख्य प्रवाहात सामील होता आल्याने त्यांच्यावरील झोपडपट्टीवासी असल्याचा शिक्का पुसला जातो.

गृहनिर्माण समुदाय कथा

बोंद्रे नगरमधील सर्वात जुन्या रहिवाशांपैकी एक राम ढेरे म्हणतात, “दर पावसाळ्यात आमच्या घरामागील गटार ओसंडून वाहते आणि घरात पाणी येते. अस्वच्छ परिस्थितीमुळे माझ्या पत्नीची तब्येत बिघडली आहे आणि तिची काळजी घेण्यासाठी मी माझी नोकरी सोडली आहे.” आता शेल्टर असो. बोंद्रे नगरमध्ये चांगल्या पायाभूत सुविधांसह नवीन घरांची सोय करत आहे. परिणामी आता, राम निरोगी आणि सन्मानाचे जीवन जगण्यास उत्सुक आहे.

श्री. राम ढेरे,

बोंद्रे नगर, कोल्हापूर

शेल्टर असोसिएट्स

सर्वाना समान हक्काचे वितरण व्हावे या हेतूने १९९४ मध्ये शेल्टर असोसिएट्स या सेवाभावी/ धर्मादाय संस्थेची स्थापना केली गेली. शेल्टर असोसिएट्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माहितीचे संकलन, स्वच्छता आणि गृहनिर्माण समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय व त्यानुसार अंमलबजावणी हा दृष्टिकोन समोर ठेऊन काम करते. शहरी विकासासाठी स्थानिक डेटा वापरण्यात अग्रेसर म्हणून शेल्टर असोसिएट्सला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

अधिक जाणून घ्या

आमच्या बातमी पत्रकाची सदस्यता घ्या!

14 + 2 =

संपर्क  

 +९१ ८०८७६०७५४५

   info@shelter-associates.org

    'कान्हा', ३४० ब, गल्ली क्रमांक १८, महात्मा सोसायटी, कोथरूड, पुणे - ४११०३८