मासिकपाळी - स्वच्छता

गरीबी आणि पर्यावरणीय र्‍हास

आधुनिक काळात उपलब्ध होणाऱ्या डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड्सचे सहजगत्या विघटन होत नसल्याने अनेक वर्ष हा कचरा साठून राहतो व पर्यावरणाची हानी होत राहते. मासिकपाळी स्वच्छतेची साधनं स्वस्त दरात उपलब्ध नसल्याने वंचित महिलांच्या आर्थिक संकटात भर पडते. पर्यावरणाचा ऱ्हास आणि महिलांवर पडणारा मासिकपाळीच्या साधनांचा आर्थिक भार अशा दुहेरी समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. त्यासाठी, महिला आणि किशोरवयीन मुलींना मासिकपाळीच्या स्वच्छतेचे महत्त्व, त्यांच्या आरोग्यावर व पर्यावरणावर डिस्पोजेबल पॅडचे होणारे दुष्परिणाम याविषयी आम्ही त्यांना शिक्षित करतो. तसेच, मासिक पाळीचे कप आणि कापडी पॅड या सारख्या पर्यावरणास अनुकूल असणाऱ्या व स्वच्छता ठेवण्यास सोप्या उत्पादनांचा वापर करण्यास आम्ही महिला व मुलींना उद्युक्त करतो. महिला त्यांचे स्वतंत्र गट तयार करतात आणि मासिक पाळीच्या आपल्या अनुभवांवर चर्चा करतात. अनुकूल स्वच्छता उत्पादनांचा वापर करण्यास एकमेकींना प्रोत्साहित करतात. अशा प्रकारच्या चर्चा, कार्यक्रम, झोपडपट्टीतील महिला व किशोरवयीन मुलींना मासिकपाळीबाबतचा त्यांचा संकुचित दृष्टिकोन बदलण्यास मदत करीत आहे.

आमचा दृष्टीकोन

छायाचित्र संग्रह

Slide-1
Slide-2
previous arrow
next arrow

शेल्टर असोसिएट्स

सर्वाना समान हक्काचे वितरण व्हावे या हेतूने १९९४ मध्ये शेल्टर असोसिएट्स या सेवाभावी/ धर्मादाय संस्थेची स्थापना केली गेली. शेल्टर असोसिएट्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माहितीचे संकलन, स्वच्छता आणि गृहनिर्माण समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय व त्यानुसार अंमलबजावणी हा दृष्टिकोन समोर ठेऊन काम करते. शहरी विकासासाठी स्थानिक डेटा वापरण्यात अग्रेसर म्हणून शेल्टर असोसिएट्सला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

अधिक जाणून घ्या

आमच्या बातमी पत्रकाची सदस्यता घ्या!

11 + 5 =

संपर्क  

 +९१ ८०८७६०७५४५

   info@shelter-associates.org

    'कान्हा', ३४० ब, गल्ली क्रमांक १८, महात्मा सोसायटी, कोथरूड, पुणे - ४११०३८