एक घर एक शौचालय

झोपडपट्टीत घरोघरी शौचालय उपलब्ध करून देणे

स्वच्छ भारत मिशन मुळे शहरे हागणदारी मुक्त करण्यास चालना मिळाली असली तरीही वाढते शहरीकरण आणि झोपडपट्ट्यांमध्ये होणारी वाढ यामुळे स्वच्छता सेवांवरचा ताण मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. सार्वजनिक शौचालयांची वाईट अवस्था, मैलावाहिन्यांची कमतरता (असुविधा) , सांस्कृतिक आणि सामाजिक मापदंड आणि जागेची कमतरता या कारणांमुळे झोपडपट्टीवासीयांना उघड्यावर शौचास जाणे किंवा अस्वच्छ व असुरक्षित अशा सार्वजनिक शौचालयांचा वापर करणे भाग पडत आहे. शेल्टर असोसिएट्सला जमा केलेल्या माहितीवरून ‘एक घर एक शौचालय’ प्रकल्प राबविताना स्वच्छता सेवांचा अभाव असलेली ठिकाणे शोधणे सहज शक्य होते. स्थानिक प्रशासनास मैलावहिन्या नव्याने घालणे, दुरुस्त करून घेणे , चांगल्या स्वच्छता पद्धतींचा अवलंब करण्यासाठी वस्तीवासीयांना एकत्र करणे सुकर होते. शौचालय बांधकाम प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष कुटुंबांला सहभागी करून घेतले जाते. शौचालय बांधकामाचे साहित्य शे. असो. पुरवते व इतर बांधकाम खर्चाचे योगदान प्रत्येक कुटुंब करतात. बर्‍याच स्थानिक प्रशासनांनी त्यांच्या स्वच्छता अभियानाचा विस्तार करण्यासाठी ‘एक घर एक शौचालय’ पद्धती अंशतः स्वीकारली आहे.

मुख्य वैशिष्ट्ये

वस्तीपातळीवरील रहिवासीयांना सुरुवातीपासूनच म्हणजे माहिती गोळा करण्याच्या पायरीपासून प्रक्रियेत सामावून घेतले जाते. कुटुंब स्वतः बांधकाम कार्यात हातभार लावत असल्यामुळे स्वतःच्या सोईनुसार बांधकाम करण्याचे स्वातंत्र्य त्यांना मिळते आणि त्यामुळे या उपक्रमास मजबुती प्राप्त होते. आजपर्यंत शे. असो. ने महाराष्ट्रातील ७ शहरांमध्ये २७००० पेक्षा जास्त शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. जवळजवळ दिड लाख लोकांना त्याचा फायदा झाला असून त्यांच्या आरोग्यावर व राहणीमानावर चांगला परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: महिला, वयात आलेल्या मुली, वृद्ध आणि अपंग व्यक्ती या सर्वांसाठी ‘एक घर एक शौचालय’ हा एक सुरक्षित आणि सन्माननीय पर्याय आहे. स्वच्छता कार्यातील एक सर्वोत्तम पर्याय म्हणून ‘एक घर एक शौचालय’ या उपक्रमाचा भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ यांनी गौरव केला आहे. तसेच UN-Habitat, NASSCOM, and FICCI यांनी देखील शेल्टर असो. च्या कार्याची दखल घेतली आहे.

प्रतिकृतीक्षमता

शाश्वतता

विस्तारक्षमता

प्रभाव

*गोखले इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी प्रकल्प मूल्यांकन अभ्यास केला.

झोपडपट्टी स्वच्छता देखरेख

झोपडपट्टी वसाहतींमधील एक घर एक शौचालय कार्यक्रमाचे आकलन करण्यायोग्य स्थानिक स्तरावर निरीक्षण केले जाते. खाली दिलेल्या नकाशामध्ये, आम्ही पिंपरी-चिंचवडच्या बालाजी नगरमध्ये लक्षणीय परिणाम आहोत. ज्याने घरगुती शौचालयांमध्ये ७१% वाढ दर्शविली आणि टॉयलेट सीट टू फॅमिली गुणोत्तर १:२३ वरून १:६ पर्यंत कमी केले.

छायाचित्र संग्रह

Slide-1
Slide-2
previous arrow
next arrow

शेल्टर असोसिएट्स

सर्वाना समान हक्काचे वितरण व्हावे या हेतूने १९९४ मध्ये शेल्टर असोसिएट्स या सेवाभावी/ धर्मादाय संस्थेची स्थापना केली गेली. शेल्टर असोसिएट्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माहितीचे संकलन, स्वच्छता आणि गृहनिर्माण समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय व त्यानुसार अंमलबजावणी हा दृष्टिकोन समोर ठेऊन काम करते. शहरी विकासासाठी स्थानिक डेटा वापरण्यात अग्रेसर म्हणून शेल्टर असोसिएट्सला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

अधिक जाणून घ्या

आमच्या बातमी पत्रकाची सदस्यता घ्या!

13 + 11 =

संपर्क  

 +९१ ८०८७६०७५४५

   info@shelter-associates.org

    'कान्हा', ३४० ब, गल्ली क्रमांक १८, महात्मा सोसायटी, कोथरूड, पुणे - ४११०३८