प्लसकोड

प्लस कोडद्वारे वस्तीतील आवश्यक सेवांची प्रवेशयोग्यता सुधारणे

प्लस कोड हा एक अद्वितीय / असाधारण अल्फा-अंकात्मक स्थानिक पत्ता आहे जो पृथ्वीवरील कोणत्याही स्थानासाठी तयार केला जाऊ शकतो. प्लस कोड हे असाधारण अल्फा-अंकात्मक पत्ते आहेत विशिष्ट स्थानाच्या अक्षांश आणि रेखांश आधारे, Google नकाशाद्वारे वाचण्यायोग्य/ पाठपुरावा करण्यायोग्य आहेत. वस्त्यांमधील छोटी घरे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी असलेले अरुंद गल्ली- बोळ, यासारखी परिस्थिती आवश्यक सेवा तत्परतेने झोपडपट्ट्यां पर्यंत पोहोचण्यासाठी अडथळा निर्माण करतात. या समस्येचे निवारण करण्यासाठी शेल्टर असोसिएट्सने पोहोचण्यास अतिशय अवघड असलेल्या झोपडपट्टीतील घरांसाठी प्लस कोड तयार करण्याची योजना गुगलच्या सहयोगाने केली आहे. शेल्टर असो. Google नकाशांमध्ये लहान झोपडपट्टी अंतर्गत रस्ते तयार करण्यास देखील मदत करते. दूरस्थ रहिवाशांना टपाल, आपत्कालीन सेवा, गॅस सिलेंडर्स आणि इतर ऑनलाइन सेवा सहजतेने मिळण्यासाठी प्लस कोड सारखी सुविधा एक वरदानच ठरते.

कार्यपद्धती

स्थानिक माहितीचा वापर करून झोपडपट्ट्यांची निवड आणि मॅपिंग

झोपडपट्टी घरे आणि पायाभूत सुविधांची माहिती संकलन

जी. आय. एस. तज्ञाद्वारे प्लसकोड निर्मिती

प्लस कोड पाटी बसवणे

समुदाय एकत्रीकरण करुन प्लसकोड प्रशिक्षण

मी पत्ता कसा शोधावा

गुगल नकाशा उघडा

प्लस कोड आणि शहराचे नाव प्रविष्ट करा

मार्ग शोधण्यासाठी प्रारंभ या बटणावर क्लिक करा

प्लस कोडचे (अल्फा-अंकात्मक पत्ता) फायदे

चांगल्या प्रशासनासाठी प्लस कोडची मदत

शेल्टर असोसिएट्स ने स्थानिक प्रशासनास प्लस कोड माहिती उपलब्ध करून दिल्याने विकास योजनांचे नियोजन , सेवासुविधांचे वाटप , त्यासाठी करावा लागणारा पाठपुरावा आणि विकास योजनांची प्रगती अथवा तत्कालीन परिस्थिती जाणून घेण्यास प्रशासनास मदत होते. प्लस कोड कसे वापरावे याबद्दल समुदायाला प्रशिक्षण देऊन त्यांना सेवाचा फायदा तत्परतेने व वेळेवर मिळावा म्हणून सक्षम केले जाते . या संपूर्ण प्रक्रियेमध्ये समुदायाला सामील करून घेतल्यामुळे समुदायांचा सहभाग वाढून विकासास चालना मिळते आणि पर्यायाने विकास सुनिश्चित होतो . एकूणच नाविन्यपूर्ण प्लस कोड तंत्रज्ञानाचा वापर हा विकास प्रक्रियेत अमुलाग्र बदल घडवून आणणारा असल्याचे सिद्ध होत असून वस्ती समुदाय आणि स्थानिक प्रशासन यांना सुशासन आणण्यासाठी महत्वपूर्ण आहे.

छायाचित्र संग्रह

Slide-1
Slide-2
previous arrow
next arrow
[et_pb_wpt_masonry_image_gallery image_ids=”2716,2713,2714,2715,2717″ image_gallery_fs=”1″ gutter=”0″ disabled_on=”on|on|on” _builder_version=”4.19.4″ _module_preset=”default” custom_css_grid-item=”margin:5px !important;” disabled=”on” global_colors_info=”{}” _i=”2″ _address=”7.0.0.2″ /]

शेल्टर असोसिएट्स

सर्वाना समान हक्काचे वितरण व्हावे या हेतूने १९९४ मध्ये शेल्टर असोसिएट्स या सेवाभावी/ धर्मादाय संस्थेची स्थापना केली गेली. शेल्टर असोसिएट्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माहितीचे संकलन, स्वच्छता आणि गृहनिर्माण समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय व त्यानुसार अंमलबजावणी हा दृष्टिकोन समोर ठेऊन काम करते. शहरी विकासासाठी स्थानिक डेटा वापरण्यात अग्रेसर म्हणून शेल्टर असोसिएट्सला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

अधिक जाणून घ्या

आमच्या बातमी पत्रकाची सदस्यता घ्या!

11 + 2 =

संपर्क  

 +९१ ८०८७६०७५४५

   info@shelter-associates.org

    'कान्हा', ३४० ब, गल्ली क्रमांक १८, महात्मा सोसायटी, कोथरूड, पुणे - ४११०३८