झोपडपट्टी पुनर्वसन

शहरी गरिबांना सामाजिक गृहनिर्माणाच्या माध्यमातून सुरक्षितता प्रदान करणे

शहरी गरिबांना दीर्घ कालावधीसाठी घरांची सुरक्षितता प्रदान करणे हा सामाजिक गृहनिर्माण प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पाद्वारे शेल्टर असो. ने पुणे आणि सांगली-मिरज येथील ३ प्रकल्पांद्वारे ८००० पेक्षा अधिक व्यक्तींचे पुनर्वसन केले आहे. अशा प्रकारचे प्रकल्प हे सरकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना एक व्यवहार्य पर्याय दर्शवितात. कारण सरकारद्वारे राबवलेले पुनर्वसन प्रकल्प हे वास्तविक माहितीपासून दूर आणि अपारदर्शक पद्धतीने राबविले जातात. शेल्टर असो. द्वारे केलेले सामाजिक गृहनिर्माण प्रकल्प पुढील गोष्टींवर आधारित आहेत

१) विशिष्ट पद्धतीने केलेले अचूक माहिती संकलन

२)रोजगार, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सुविधा या क्षेत्रांसह घरांना शहराचा अविभाज्य भाग मानणाऱ्या शहरव्यापी दृष्टिकोनातून निर्माण

३) लाभार्थी व इतर, यांचे बरोबर भागीदारी तत्वावर प्रकल्प.

अशा प्रकारे केले जाणारे झोपडपट्टी पुनर्वसन पुढील काही पिढ्यांसाठी सुरक्षितता प्रदान करते

पूर्ण झालेले प्रकल्प

दत्तवाडी, पुणे

कामगार पुतळा, पुणे

आबा धोत्रे, सांगली-मिरज

शहरी गरीबांना लाभ

पुरेसा प्रकाश आणि वायुवीजन

जागेचा योग्य वापर

पशुधनासाठी जागा

दृश्य निरीक्षणाद्वारे सुरक्षितता

मूलभूत सेवांची उपलब्धता

छायाचित्र संग्रह

Slide-1
Slide-2
previous arrow
next arrow

शेल्टर असोसिएट्स

सर्वाना समान हक्काचे वितरण व्हावे या हेतूने १९९४ मध्ये शेल्टर असोसिएट्स या सेवाभावी/ धर्मादाय संस्थेची स्थापना केली गेली. शेल्टर असोसिएट्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माहितीचे संकलन, स्वच्छता आणि गृहनिर्माण समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय व त्यानुसार अंमलबजावणी हा दृष्टिकोन समोर ठेऊन काम करते. शहरी विकासासाठी स्थानिक डेटा वापरण्यात अग्रेसर म्हणून शेल्टर असोसिएट्सला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

अधिक जाणून घ्या

आमच्या बातमी पत्रकाची सदस्यता घ्या!

10 + 1 =

संपर्क  

 +९१ ८०८७६०७५४५

   info@shelter-associates.org

    'कान्हा', ३४० ब, गल्ली क्रमांक १८, महात्मा सोसायटी, कोथरूड, पुणे - ४११०३८