घनकचरा व्यवस्थापन

डेटा-चलित घनकचरा संकलन,  विभाजनाचा पाठपुरावा आणि देखरेख

शहरांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे घनकचरा व्यवस्थापनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. घरा-घरांमधून वेगळ्या न केलेल्या घनकचऱ्याचे ढिगारे मोकळ्या जागेवर साठवले जातात. परिणामी, हा कचरा आजूबाजूच्या परिसराचे, लोकांच्या आरोग्याचे विनाशकारी नुकसान करतो. आपली जमीन आणि पाण्याचे स्रोत प्रदूषित करतो. दुर्गंधीसह कचऱ्याचा दृश्य प्रभाव लोकांच्या आरोग्याची भावना कमी करतो. या विषयावर जागरुकता नसल्याने आणि संसाधनांचा अभाव असल्याने झोपडपट्ट्यांमधील परिस्थिती विशेष चिंताजनक आहे. म्हणूनच, पर्यावरणीय प्रदूषण कमी करण्यासाठी आणि आरोग्याशी संबंधित धोके टाळण्यासाठी झोपडपट्ट्यांमधील घनकचरा व्यवस्थापन (एस. डब्ल्यू. एम.) अतिशय महत्त्वाचे आहे.

आमचा दृष्टिकोन

घनकचरा संकलन आणि विलगीकरण संबंधीच्या परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आम्ही झोपडपट्ट्यांमध्ये सर्वेक्षण करतो. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांच्या आधारे आम्ही वस्तीतील लोकांमध्ये विविध प्रकारचा घनकचरा ओळखणे, त्याचे विलगीकरण करणे आणि त्याची सुरक्षित विल्हेवाट लावणे याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी विषयावर आधारित चर्चा, खेळ, पथनाट्य, रॅली, गाणी आणि कार्यशाळा आयोजित करतो. आमचे प्रशिक्षित स्वयंसेवक कचरा संकलनाचा मागोवा घेण्यासाठी स्थानिक डेटाचा वापर करून वस्तीतील प्रत्येक घरातून कचरा गोळा केला जात आहे ना हे तपासतात. तसेच आम्ही वस्तीतील समुदाय सदस्यांना शहरी स्थानिक व्यवस्थापनाबरोबर मलनिस्सारण वाहिनी घालण्यासाठी, कचरा डब्यांची व्यवस्था आणि कचरा टाकण्याच्या ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी समन्वय साधण्यास मदत करतो. प्रात्यक्षिके आणि सकारात्मक बदलाला चालना देऊन आम्ही वस्तीवासीयांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयींचा अवलंब करण्यास उद्युक्त करतो.

छायाचित्र संग्रह

Slide-1
Slide-2
previous arrow
next arrow
[et_pb_wpt_masonry_image_gallery image_ids=”2130,2132,2131,2134,2133″ image_gallery_fs=”1″ gutter=”0″ disabled_on=”on|on|on” _builder_version=”4.19.4″ _module_preset=”default” custom_css_grid-item=”margin:5px !important;” disabled=”on” global_colors_info=”{}” _i=”2″ _address=”3.0.0.2″ /]

शेल्टर असोसिएट्स

सर्वाना समान हक्काचे वितरण व्हावे या हेतूने १९९४ मध्ये शेल्टर असोसिएट्स या सेवाभावी/ धर्मादाय संस्थेची स्थापना केली गेली. शेल्टर असोसिएट्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माहितीचे संकलन, स्वच्छता आणि गृहनिर्माण समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय व त्यानुसार अंमलबजावणी हा दृष्टिकोन समोर ठेऊन काम करते. शहरी विकासासाठी स्थानिक डेटा वापरण्यात अग्रेसर म्हणून शेल्टर असोसिएट्सला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

अधिक जाणून घ्या

आमच्या बातमी पत्रकाची सदस्यता घ्या!

10 + 15 =

संपर्क  

 +९१ ८०८७६०७५४५

   info@shelter-associates.org

    'कान्हा', ३४० ब, गल्ली क्रमांक १८, महात्मा सोसायटी, कोथरूड, पुणे - ४११०३८